¡Sorpréndeme!

Mumbai Best Bus News | बेस्ट बसची भाडेवाढ दुप्पट होण्याची दाट शक्यता, 'बेस्ट' प्रवास महागणार?

2025-04-28 0 Dailymotion

Mumbai Best Bus News | बेस्ट बसची भाडेवाढ दुप्पट होण्याची दाट शक्यता, 'बेस्ट' प्रवास महागणार?
बेस्ट बसचे भाडे दुप्पट होणार? भाडेवाढीला मुंबई महापालिकेची मंजरी  मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे.  मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या भाडेवाढीसाठी आग्रह धरला होता. त्याला आता मान्यता मिळाल्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसै मोजावे लागणार आहेत.  बेस्ट उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात गेला असून संचित तूट सहा हजार कोटींच्या पलिकडे गेली आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात भाडेतत्त्वावर बेस्टच्या गाड्या खरेदी करून बेस्टचे तिकिट पाच रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमाचा तोटा उलट वाढतच गेला. बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन खर्च भागवणेही मुश्कील झाले आहे. कामगारांची देणी द्यायलाही बेस्टकडे निधी नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यात बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला होता.